spot_img
spot_img
spot_img

भरधाव ट्रकच्या धडकेत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ट्रक चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाणेर येथील आपुलकी हॉस्पिटलसमोरील प्लाय ओव्हर परिसरात घडली. वरद विनोद पाटील (वय १८ ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास आरोपी दादा पांडुरंग गायकवाड (वय ४९) हा टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एमएच ११ सीएच ५७०७ भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादीच्या मित्राच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच ११ सीआर ५४३० हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील सागर येवले (वय १८) याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी वर्धन पाटील हेही जखमी झाले. या अपघातास तसेच मोटारसायकलच्या नुकसानीस ट्रकचालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), १२५(अ), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रकचालक दादा पांडुरंग गायकवाड याच्याविरोधात पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!