spot_img
spot_img
spot_img

काळेवाडीतील विजयनगर बसथांब्यावरून दीड लाखांची ऑटो रिक्षा चोरीला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केलेली सुमारे दीड लाख रुपये किमतीची तीनचाकी ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना काळेवाडीतील विजयनगर बसथांबा परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाने काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राकेश विठ्ठल टोनपे (वय ३५, व्यवसाय रिक्षाचालक, रा. मोरया कॉलनी, विजयनगर, काळेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० या कालावधीत विजयनगर बसथांबा, काळेवाडी, पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर ही चोरी झाली.

फिर्यादी यांनी त्यांची काळ्या-पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची तीनचाकी ऑटो रिक्षा क्रमांक एमएच १४ एचएम ७७२७ सार्वजनिक रस्त्यावर लॉक करून पार्क केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि कोणताही अधिकार नसताना रिक्षा चोरून नेली. या रिक्षाची किंमत अंदाजे एक लाख ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.०४ वाजता काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!