spot_img
spot_img
spot_img

‘एक हात मदतीचा’ उपक्रम मांडवेत पोहोचला, ३०० मदत किटचे वाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील मांडवे गावात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या ३०० किटचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत ल-प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका रेखा देवराम देवकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. दैनंदिन वापरासाठी आवश्यक वस्तू देऊन कुटुंबांच्या घरखर्चाला हातभार लावणे, हा वाटपाचा उद्देश होता.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक, हार-तुरे आणि सत्कारांवरील खर्च टाळून त्यातून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमधील ५१ आदिवासी व दुष्काळग्रस्त गावांतील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन आहे.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याची बचत करण्यासह दुष्काळग्रस्त कुटुंबे, शेतकरी आणि आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत ल-प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका रेखा देवराम देवकर यांच्या पुढाकाराने जुन्नर तालुक्यातील मांडवे गावात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या ३०० किटचे वाटप करण्यात आले.

“रोजच्या घरखर्चाची जुळवाजुळव करताना जीवनावश्यक वस्तूंची मदत कुटुंबांना दिलासा देते. ही गरज लक्षात घेऊन आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवे गावात ३०० मदत किटचे वाटप केले. गावातील गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत प्रत्यक्ष पोहोचवता आली, याचे समाधान आहे.”

– रेखा देवकर, ल-प्रभाग अध्यक्षा तथा नगरसेविका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!