शबनम न्यूज | प्रतिनिधी
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील दुर्गम नानवडे गावातील १०० गरजू आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश मळेकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत हे सेवाकार्य राबविले.
वाढदिवसानिमित्त गरजू कुटुंबांना दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल अशी मदत देण्याचा निर्णय मळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार नानवडे गावातील १०० आदिवासी कुटुंबांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संच देण्यात आले. वाटपावेळी गणेश मळेकर यांच्यासह प्रताप जाधव, उमेश यादव, गणेश देशमुख, तानाजी अडलिंगे आणि शुभम बिराजदार उपस्थित होते.
ग्रामस्थांकडून कृतज्ञता, महेश लांडगे यांना शुभेच्छा
उपक्रमाला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी मिळालेल्या मदतीबद्दल गणेश मळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. आमदार महेश लांडगे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छाही दिल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने दुर्गम भागातील कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.,
“महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागातील कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडेल अशी मदत द्यावी, या उद्देशाने आम्ही नानवडेत हा उपक्रम राबविला. सहकाऱ्यांच्या मदतीने १०० आदिवासी कुटुंबांपर्यंत अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्य पोहोचवता आले. वाढदिवसाच्या आनंदात या कुटुंबांना सामावून घेता आले, याचे समाधान आहे. या कामात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार.”
– गणेश मळेकर, सामाजिक कार्यकर्ते.




Total Users : 243000