spot_img
spot_img
spot_img

अजमेरा सोसायटी रोड, नेहरूनगरमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा!

दोन ठिकाणची सुमारे १ हजार ४५० चौ. फुटांची पत्राशेड निष्कासित

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ मधील अजमेरा सोसायटी रोड आणि नेहरूनगर परिसरातील अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन ठिकाणची अंदाजे १ हजार ४५० चौरस फूट क्षेत्रफळाची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त-२ तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील बीट निरीक्षक प्रतिका चौरंगे, सौरभ शिरसाठ, इम्रान पठाण आणि दत्तात्रय छडीदार यांच्यासह १९ एमएसएफ जवान, सहा मजूर यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. कारवाईसाठी एक जेसीबी आणि एका क्रेनची मदत घेण्यात आली.

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने थेट निष्कासनाची कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!