spot_img
spot_img
spot_img

बोरघर कोकणेवाडीत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; शिवराज लांडगे यांच्या पुढाकारातून किटवाटप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील बोरघर कोकणेवाडी येथील गरजू कुटुंबांना धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजपा इंद्रायणीनगर–भोसरीचे मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी गावाला भेट देऊन ही मदत कुटुंबांपर्यंत पोहोचवली. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत हे वाटप करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वापरावी, या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता.

उपक्रमांतर्गत खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतका किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचे नियोजन आहे. याच उपक्रमातून शिवराज लांडगे यांनी बोरघर कोकणेवाडीत प्रत्यक्ष जाऊन मदतीचे वाटप केले.

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वापरावा, या विचारातून ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत बोरघर कोकणेवाडीत प्रत्यक्ष जाऊन आम्ही गरजू कुटुंबांना धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची किट दिली. या मदतीमुळे कुटुंबांच्या दैनंदिन खर्चाला काहीसा हातभार लागेल.”

– शिवराज लांडगे, भाजपा इंद्रायणीनगर, भोसरी मंडलाध्यक्ष.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!