spot_img
spot_img
spot_img

लोहकरवाडीतील गरजू कुटुंबांसाठी नगरसेविका अर्चना करांडे यांचा पुढाकार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील लोहकरवाडी येथील गरजू कुटुंबांना मदत पोहोचवण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सौ. अर्चना अक्षय करांडे यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पिंपरी-चिंचवडच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत त्यांनी लोहकरवाडीसाठी सहभाग घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जवर होणारा खर्च गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी वळवावा, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील लोकप्रतिनिधींनाही ग्रामीण भागातील कुटुंबांच्या मदतीसाठी सहभागी करून घेण्यात आले आहे.

या जिल्हास्तरीय उपक्रमात प्रभाग क्रमांक १३ मधून सहभागी होत करांडे यांनी जुन्नर तालुक्यातील लोहकरवाडीवर लक्ष केंद्रित केले आहे. लोहकरवाडीतील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवण्यावर त्यांच्या सहभागाचा भर आहे.

“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमात सहभागी होताना आम्ही जुन्नर तालुक्यातील लोहकरवाडीची निवड केली. गावातील गरजू कुटुंबांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधी म्हणून गरजेच्या वेळी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, ही आमची जबाबदारी आहे.”

– अर्चना करांडे, नगरसेविका तथा अध्यक्षा, अ-प्रभाग, पिंपरी-चिंचवड.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!