शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आज ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली.
स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा सभापती प्रमोद कुटे, नगरसेवक उत्तम केंदळे, राजू मिसाळ, बापू घोलप, अमित गावडे, सुजाता कारंडे,
तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, दळणवळण विभाग, बीआरटीएस विभाग, वाहतूक विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंगच्या निर्माण झालेल्या समस्या, रस्त्यांवरील अडचणी तसेच नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. या वाहतुकीच्या मुद्द्यासोबतच पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि इतर सर्व महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजासंदर्भातही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
नागरिकांकडून सातत्याने मांडण्यात येणाऱ्या समस्या, प्रलंबित कामे आणि आवश्यक उपाययोजनांबाबत प्रत्येक विभागाला योग्य त्या कठोर सूचना देण्यात आल्या असून, कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
“शहराचा सुनियोजित विकास साधणे आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठी मदत होईल. नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता व इतर प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रलंबित कामे कोणतीही कुचराई न करता वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा थेट फायदा होईल,”
– अभिषेक बारणे – स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.




Total Users : 240427