शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोक जनशक्ती पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने दीपावली सणानिमित्त फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आयु. सुंदर कांबळे आणि महिला शहराध्यक्ष अदिती ताई क्षेत्रे यांनी केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष प्रकाश दाभाडे, उपाध्यक्ष तानाजी पवार आणि सचिव अविनाश भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला उपाध्यक्ष वृषालीताई कदम यांनी केले, तर शहर उपाध्यक्ष अमितकुमार आर्या यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दीपावलीच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक एकोपा व पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.




Total Users : 239513