spot_img
spot_img
spot_img

एमपीएससी परीक्षांतील गैरव्यवहार चौकशी; निवेदने सादर करण्यास २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे निवेदने सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त असलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आता २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपली निवेदने सादर करता येणार आहेत. यापूर्वी निवेदने सादर करण्यासाठी १६ नोव्हेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती.

या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्तींनी तसेच परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांनी आयोगाने निश्चित केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात मराठी किंवा इंग्रजी भाषेत आपली निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. तसेच स्वप्रमाणित प्रतिज्ञापत्राची प्रत, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या [email protected]  या ई-मेलवरही पाठवता येईल. तसेच तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. २३ नोव्हेंबर २०२६ ही निवेदने स्वीकारण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर प्राप्त होणारी कोणतीही प्रतिज्ञापत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे सर्व संबंधितांनी विहित मुदतीत आपली प्रतिज्ञापत्रे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!