spot_img
spot_img
spot_img

थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर तसेच विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    अभिवादन प्रसंगी नगरसदस्य कृष्णा सुरकुले, माजी नगरसदस्या उषा मुंढे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वाहनचालक संतोष खामकर, विद्युत विभागाचे विष्णु गवारे तसेच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव,दत्तात्रय कोकाटे आदी उपस्थित होते.

लहानपणापासूनच देशभक्तीची आवड असलेले थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारून, हजारो क्रांतिकारकांची फौज केली आणि केवळ तीर कामठासारख्या शस्त्रांनी त्यांनी दिलेला अनोखा लढा स्वातंत्र्यलढ्याच्या पुस्तकात सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे, भावी पिढीने क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा प्रखर देशभक्तीचा आदर्श घ्यावा असे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!