शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील हिलक्रिस्ट सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शत्रुघ्न काटे,नगरसेविका अनिताताई काटे कार्यालय प्रतिनिधी आणि नगरसेविका सौ कुंदाताई भिसे कार्यकर्त्यांनी तातडीने अग्निशामक दलाशी संपर्क साधला आणि घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्याची सूचना दिली.
अग्निशामक दलाच्या पथकाने सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू केल्या. आगीचा धूर परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र, अग्निशामक दलाच्या वेळेवर पोहोचण्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला.
सणाच्या आनंदाच्या वातावरणात अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लक्ष दिले आणि युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अग्निशामक दलाशी त्वरित संपर्क साधण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी या तातडीच्या खबरदारीमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापासून टळल्याचे व गंभीर नुकसान टाळण्यात यश आल्याचे सांगितले.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू असून, अग्निशामक दलाचे जवान बचाव व नियंत्रण कार्यात व्यस्त आहेत.
नागरिकांची दखल,अग्निशामक दलाची तत्परता, नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची तातडीची मदत आणि नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका सौ कुंदाताई भिसे यांच्या कार्यकर्त्यांचा समन्वय यामुळे मोठी दुर्घटना टाळण्यात यश आल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.




Total Users : 237909