spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : आगामी राजकीय वाटचाल अधिक संघटित आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. पक्षाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, शहराध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या पत्रानुसार या कार्यकारिणीला पक्षाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने शहरातील पक्ष संघटनेला नवी दिशा आणि बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत शहर सरचिटणीसपदी जयंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष आणि प्रवक्तेपदाची दुहेरी जबाबदारी काशिनाथ जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी नियुक्त्या :
शकुंतला भाट, प्रशांत कापसे, अनिल भोसले, अॅड. अमोल गव्हाणे, मयूर जाधव, माणिक पाटील, सुनील कस्पटे, सचिन चावरे, अॅड. सोपान पाटील आणि अमोल पाटील यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोषाध्यक्षपदी विजयकुमार पिरंगुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी अॅड. संतोष शिंदे, राजू खंडागळे, विजय बाबर, राहुल धनवे, संजीवनी पुराणिक आणि नितीन मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

संघटक सचिवपदी ज्ञानेश आल्हाट, सुनील पवार आणि रंजीत आवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सचिवपदी सुदाम शिंदे, विवेक विधाते आणि प्रमोदिनी लांडगे यांना संधी देण्यात आली आहे.

शहरातील पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, विविध प्रभागांमध्ये पक्षाचा जनसंपर्क मजबूत करणे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे या दृष्टीने नव्या कार्यकारिणीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!