spot_img
spot_img
spot_img

पीसीसीओई मध्ये “पालक व विद्यार्थी संबंध दृढता सभा” संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अंतर्गत सार्वत्रिक मानवी मूल्य नोडल केंद्र (यूएचव्ही) सेलच्या सहकार्याने “पालक व विद्यार्थी संबंध दृढता सभा” आयोजित करण्यात आली होती. 
      यावेळी पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उप संचालक डॉ. निळकंठ चोपडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. राजेश्वरी कन्नन, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. लीना शर्मा, डॉ. संदीप पाटील, मंजुषा देवकुळे, युएचव्ही सेल मार्गदर्शक डॉ. महेश कोलते आदी उपस्थित होते. या सभेस पुणे, मुंबई, नागपूर, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक,अमरावती, भुसावळ, जळगाव आणि शिर्डी आदी विविध शहरातील ८३ पालकांनी सहभाग घेतला होता. पालक व विद्यार्थी चिंतनशील पत्रलेखन उपक्रमात पालकांच्या मुलांबाबत स्नेह, आशा, अपेक्षा, कौतुक, भावना व्यक्त झाल्या.     
      डॉ. राजेश्वरी कन्नन यांनी सांगितले की, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पालक आणि विद्यार्थी यांच्या मधील नात्यांमध्ये बदल होतात. मुलांची वाढते वय, त्यांना हवे असलेले स्वातंत्र्य, त्यांचा विकसित होणारा दृष्टिकोन आणि स्वायत्तेची गरज ओळखून पालकांनी मुलांना भावनिक सुरक्षा, विश्वास आणि योग्य मार्गदर्शन करावे.
     डॉ. लीना शर्मा यांनी सांगितले की, पालकांनी पाल्यांसोबत प्रेमळ संवाद साधावा. परस्पर सामंजस्य आणि सामायिक जबाबदारी यासाठी प्रोत्साहन द्यावे. पालकांनी घरात व नात्यात असे वातावरण निर्माण करावे की मुले चिंता व्यक्त करताना, चुका मान्य करताना, आव्हानात्मक परिस्थितीत निर्णय घेण्यास पालकांशी हितगुज साधायला तयार झाली पाहिजेत.
     डॉ. संदीप पाटील यांनी शैक्षणिक व वास्तविक काही जीवनातील प्रसंग सांगून विद्यार्थ्यांशी संवादात्मक चर्चा केली.
     समन्वयक मंजुषा देवकुळे यांनी वैश्विक मानवी मूल्य यांचे महत्त्व सांगितले. नाते संबंधात विश्वास, आदर, स्नेह, काळजी आणि मार्गदर्शन ही मूल्यं आवश्यक आहेत.
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या पालक – विद्यार्थी संबंध दृढता सभेचे आयोजन करण्यात आले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!