शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिवाळीच्या मंगलमय पर्वात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीताचे सुरेल स्वर, भक्तिमय गीते आणि रसिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचा सोहळा अविस्मरणीय ठरला. सालाबादप्रमाणे यंदाही कै. सौ. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि भोईर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सुरेल कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
पहाटेच्या मंगलमय वेळी दीपोत्सवाचा प्रकाश, संगीताचे मनमोहक सूर आणि रसिकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व संगीतमय झाले होते. विविध गुणी कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या सुरेल मैफिलीने दिवाळीच्या आनंदात आणखी भर घातली.

दिवाळीच्या या मंगलमय आणि सुरेल वातावरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनीही आपल्या गायनकलेची अनोखी झलक सादर केली. संगीताच्या मैफिलीने भारावून गेलेल्या भाऊसाहेब भोईर यांनी स्वतः माईक हातात घेत आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली. त्यांच्या या अनपेक्षित गायनाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वासोबतच आपल्यातील कलाप्रेमी व्यक्तिमत्त्वाचेही त्यांनी दर्शन घडविले. त्यांच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

कै. सौ. मनिषा भाऊसाहेब भोईर यांच्या स्मृती जपत भोईर परिवाराच्या वतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठेवता समाजातील नागरिकांना एकत्र आणणारा, कला आणि संगीताचा आनंद देणारा हा उपक्रम ठरत आहे. यंदाही रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्यात सहभागी झालेल्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत वाढवली. उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक आणि रसिक बंधू-भगिनींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर आयोजकांनी सर्व कलाकार, मान्यवर, मार्गदर्शक आणि रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले. सर्वांच्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे यंदाची ‘दिवाळी पहाट’ अविस्मरणीय ठरल्याची भावना भोईर परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली.




Total Users : 237891