spot_img
spot_img
spot_img

भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अंकुशराव लांडगे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन; शहर कार्यालयात स्मृतिदिन साजरा

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लांडगे यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पक्षाचे शहराध्यक्ष तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा यावेळी उपस्थितांनी स्मरण केले.

या अभिवादन कार्यक्रमास भाजपचे जिल्हा महामंत्री मोरेश्वर शेडगे, नगरसेवक निखिल बोर्हाडे, चंद्रकांत नखाते, पक्षाचे प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, संतोष तापकीर, देवदत्त लांडे, रवींद्र देशपांडे, दिलीप राऊत, रविंद्र नांदुरकर, रामदास काळजे, संजय परळीकर, मनीष पंजाबी, नंदूकाका भोगले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!