spot_img
spot_img
spot_img

उन्नती सोशल फाउंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राजकारणासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. शनिवार दि. ७ रोजी उन्नतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात पिंपळे सौदागर प्रभागाच्या नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे , पराग त्यागी, बाळकृष्ण चौधरी, सफाई कामगारांचे प्रतिनिधी मिलिंद नाईक आणि भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपळे सौदागर परिसराची स्वच्छता राखण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना डॉ . कंदाताई भिसे आणि संजय भिसे यांच्याहस्ते याप्रसंगी भेटवस्तू आणि मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!