spot_img
spot_img
spot_img

पहिले संविधान सन्मान महिला साहित्य संमेलन २६ नोव्हेंबरला पुण्यात

अ‍ॅड. प्रार्थना सदावर्ते संमेलनाध्यक्ष; लडकत दाम्पत्यास ‘सावित्रीज्योती’, तर वानखेडे दांपत्यास ‘रमाई भीमराव’ पुरस्कार जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विश्वबंधुता साहित्य परिषद आणि सहयोगी संस्थांच्या वतीने संविधान दिनाच्या (२६ नोव्हेंबर २०२६) निमित्ताने पहिले संविधान सन्मान महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘सावित्रीज्योती’ पुरस्कार सत्यशोधक सनदी अधिकारी नानासाहेब व सुनीता लडकत यांना, तर ‘रमाई भीमराव’ पुरस्कार साहित्यिक प्रा. चंद्रकांत व पौर्णिमा वानखेडे यांना जाहीर झाला आहे. विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या हस्ते हा या पुरस्करांचे वितरण होईल, अशी माहिती सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी दिली.

संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिका अ‍ॅड. प्रार्थना सदावर्ते या भूषवत असून, संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. याप्रसंगी स्वागताध्यक्ष मंदाकिनी रोकडे, कार्याध्यक्ष प्रा. सायली गोसावी, कार्यवाह संगिता झिंजुरके, यांची उपस्थिती राहिल. पत्रकार शबनम सय्यद आणि सायली जोशी यांचा ‘संविधान सन्मान पत्रकारिता पुरस्कार’ देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात लातूर येथील प्रिया माळी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन होईल. यामध्ये महाराष्ट्रातील ३० नामवंत कवियीत्री सहभागी होणार आहेत. यावेळी काव्यप्रतिभा तसेच प्रज्ञावंत साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात येतील. डॉ. सविता पाटील, सुलभा निवंगुणे, प्रा. भारती जाधव, डॉ. बंडोपंत कांबळे आणि प्रा. प्रशांत रोकडे संमेलनाचे काम पाहत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!