शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये सन १९९२. पासून निमगावकेतकी,, नसरापूर, कापूरहोळ,पानशेत, कामशेत, चऱ्होली, मोशी, चिखली, आकुर्डी इ. शाखांमधून ३४ वर्ष अध्यापन करीत श्री शिवाजी विद्यालय देहुरोड येथे पर्यवेक्षिका पदभार सांभाळून ३१ आक्टों २०२६ ला सेवानिवृत्त झाल्या .
शामला रामचंद्र पंडित यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धतीमुळे, विषयावरील प्रभुत्वामुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा निकाल दरवर्षी १००% लागण्यात मोलाचा वाटा राहिला आहे.
त्यांचा हा प्रवास म्हणजे निष्ठा, परिश्रम आणि समर्पणाचा एक दीपस्तंभ आहे.शिक्षणाकडे केवळ एक कर्तव्य म्हणून पाहिले नाही, तर तो एक यज्ञ मानला. सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध, वकृत्व, नाट्यस्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेऊ वेळोवेळी सन्मान प्राप्त करून दिले नाट्यसंहिता त्या स्वतः लिहीत असत .सकाळ नाट्यवाचनामध्ये पुरस्कार प्राप्त झाले होते .सन २०१९ – २० ऑनलाइन विजेता महाराष्ट्राचा भाषण स्पर्धेत विद्यार्थी विजेता म्हणून निवड झाली. क्रीडा स्पर्धा , विद्यार्थ्यांना समुपदेशन ,विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, अडीअडचण सोडविण्यास मार्गदर्शन केले .
कर्तव्यनिष्ठा, हसतमुख स्वभाव, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, एक मार्गदर्शक, मित्र आणि तत्त्वज्ञ म्हणून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले. आपली ही पोकळी शाळा कधीही भरून काढू शकणार नाही
शाळेचा एक मजबूत स्तंभ होत्या. त्यांची शिस्त, वेळेचे भान आणि अध्यापनातील समर्पण वृत्ती येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
एका शब्दाचे दोन अर्थ घेऊन शामलाक्षरी नव काव्यनिर्मिती. केली आहे .मराठी साहित्याला लाभलेली शामलाक्षरी एक देणगी म्हणावे लागेल .८ मार्च २०१६ पासून महिलादिनी पहिली कविता लिहिली काव्य लेखनास प्रारंभ झाला.
आजपर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत . पुस्तकांसाठी
मा. ना. कै अजितदादा पवार साहेब व मा . ना . सुनेत्रा वहिनी पवार साहेब ( उपमुख्यमंत्री महा. राज्य ,अध्यक्ष,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ) यांची शुभेच्छापत्रे लाभली आहेत.
“अष्टपैलू”अष्टाक्षरी काव्यरचनांचे पुस्तक यासाठी
प्रस्तावना प्रख्यात संगीतकार मा. अशोकजी पत्की यांची आहे.याशिवाय इतर पुस्तकांना मा. श्रीपाल सबनीस, मा, पद्मश्री गिरीश प्रभुणे , मा, प्रतिमा इंगोले, मा.ब. ल. पोतदार, मा.अजय बिरारी,मा. जयसिंग गाडेकर,इ. मान्यवरांची प्रस्तावना लाभली आहे.
पिंपरी चिंचवड गुणवंत शिक्षक पुरस्कार,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्था आदर्श शिक्षक पुरस्कार
,महिला दिन विशेष सन्मान,काव्य सादरीकरणाचे सन्मान,विद्यार्थी वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य यांचेकडून सन्मान.नक्षत्राचे देणे ओझर येथे संमेलन चित्र काव्य स्पर्धा द्वितीय क्रमांक ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार – ऑगस्ट २०२५, दिलासा साहित्य समूह पिंपरी चिंचवड ,
सकाळ नवदुर्गा सन्मान – २०२५,
२शिक्षण संजीवनी पुणे यांचा महिला दिन विशेष सन्मान २०२६
यासारखे महत्वपूर्ण सन्मान त्यांना लाभले,
त्यांनी मनोगत व्यक्त करताना
“क्षिक्षकीपेशा माझ्यासाठी केवळ नोकरी नव्हती तर ते माझे जीवन होते. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यांमुळेच मी माझी सेवा यशस्वीपणे पूर्ण करू शकले. निवृत्त झाले तरी शिक्षणाचा हा ध्यास कायम राहील.”




Total Users : 237930