spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत तरुणावर कोयत्याने वार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी शिवीगाळ करत तरुणावर हल्ला केला. यावेळी कोयत्याने वार करून तरुणाला जखमी करण्यात आले. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जे.पी. मेडिकलसमोरील रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. तिचा मुलगा सुजल सुनील कांबळे (वय २१) आणि त्याचा मित्र नितीन रणखांबे हे जे.पी. मेडिकलसमोर मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी सुजल कांबळे आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील निलेश टोपे याने त्याच्याजवळील कोयत्याने वार करून सुजल कांबळे याला जखमी केले.

याप्रकरणी अन्य आरोपी म्हणून तुषार देविदास साळवे (वय अंदाजे २०), निलेश टोपे (वय अंदाजे १९) आणि शुभम यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. आरोपी अद्याप अटक नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पिंपरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!