spot_img
spot_img
spot_img

प्रभाग क्रमांक २३ च्या विकासासाठी योगिता बारणे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी सविस्तर चर्चा!

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक २३ मधील नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्यासह प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेविका सौ. योगिता महेश बारणे यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा माननीय सुनेत्रावहिनी पवार यांची भेट घेतली. या भेटीत प्रभागातील विविध समस्यांसह भविष्यातील विकासाचा आराखडा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रभागाचा विकास केवळ मूलभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी योगिता बारणे यांनी विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले.

यामध्ये प्रभागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीवर उपाययोजना, पावसाळी पाणी निचरा व्यवस्था, ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्थेचे सक्षमीकरण, नियमित व पुरेसा पाणीपुरवठा, उद्यानांचे सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा, अत्याधुनिक क्रीडांगणे आणि मुलांसाठी खेळाच्या मैदानांची निर्मिती अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, सीसीटीव्ही यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांनाही प्राधान्य देण्याची भूमिका मांडण्यात आली.

विशेष म्हणजे, प्रभागातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन विकास प्रकल्पांना मंजुरी आणि आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठीही पाठपुरावा करण्यात आला.

नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार योगिता बारणे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वाहिनी पवार यांनी हि सकारात्मकता दाखवत मनपा प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात येतील तसेच विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले

कोट –

नागरिकांच्या अपेक्षा, विकासकामांचा वेग आणि आधुनिक सुविधांनी युक्त प्रभागाची निर्मिती, हेच आपले ध्येय असल्याचे सांगत योगिता बारणे यांनी प्रभाग क्रमांक २३ च्या सर्वांगीण विकासासाठी आपला प्रयत्न सुरूच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

— नगरसेविका सौ. योगिता महेश बारणे
सदस्य, शिक्षण मंडळ समिती

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!