शबनम न्यूज | प्रतिनिधी
बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीसंदर्भात सामोपचाराने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
कल्याण तालुक्यातील मौजे चिकणघर येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जमिनीबाबत तसेच बुद्धभूमी आंतरराष्ट्रीय बौद्ध पर्यटन केंद्र विकसित करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आढावा बैठक झाली.
संबंधित जमीन कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने देण्याबाबत तसेच त्यासंदर्भातील नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कामांमुळे बुद्धभूमी फाउंडेशनचे काही नुकसान झाले असल्यास ते संबंधित कंत्राटदाराकडून भरून घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीस कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, एमएमआरडीएचे संबंधित अधिकारी तसेच बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.




Total Users : 233196