spot_img
spot_img
spot_img

श्री राजेंद्रसिंग वालिया यांना ‘महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र क्राईम न्यूजच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्यात पँथर आर्मी क्रांती सेनेचे राष्ट्रीय नेते राजेंद्रसिंग वालिया यांना ‘महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र क्राईम न्यूजचे मुख्य संपादक एकनाथ अडसूळ यांच्या पुढाकारातून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. डिसेंबर २०२६ मध्ये मुंबई येथे हा कार्यक्रम होणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

राजेंद्रसिंग वालिया यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, समाजातील विविध घटकांसाठी दिलेले योगदान आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केलेले प्रयत्न यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या सोहळ्यात कला, सामाजिक कार्य, कृषी, आरोग्य यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ३० शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर राजेंद्रसिंग वालिया यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!