spot_img
spot_img
spot_img

‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पदवीधर मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली असून, पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कासाठी लढणाऱ्या खंबीर लोकप्रतिनिधीला निवडून देणे काळाची गरज आहे, असे आवाहन आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांनी केले. रविराज काळे यांनी आज हिंजवडी येथील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा’ येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.  
​यावेळी बोलताना रविराज काळे म्हणाले की, “सध्याच्या भ्रष्ट सरकारच्या धोरणांविरोधात आणि पदवीधरांच्या हितासाठी सर्व पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे. पदवीधरांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवाराला पाठिंबा देणे गरजेचे आहे.”
​मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व पदवीधरांना लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन केले. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!