खरेदी करा भरभरून, महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना द्या बळ!
निगडी : दिवाळीच्या सणानिमित्त स्थानिक महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नारीशक्ती महोत्सव प्रस्तुत ‘दिवाळी स्टॉल’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना विविध वस्तूंची आकर्षक पर्वणी मिळणार असून, महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे,.
या दिवाळी स्टॉलमध्ये ज्वेलरी, दिवाळी विशेष वस्तू, आकर्षक कपडे तसेच विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. सणासुदीच्या खरेदीसोबतच स्थानिक महिला उद्योजिकांच्या व्यवसायाला हातभार लावण्याची संधीही नागरिकांना मिळणार .
या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद आमदार मा. उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाच्या आयोजिका सौ. अर्चनाताई गोमकाळे असून, संयोजक म्हणून श्री. जयदीपदादा खापरे, मंडळ अध्यक्ष, चिंचवड प्राधिकरण मंडळ हे काम पाहत आहेत.
दिनांक : २१ व २२ ऑक्टोबर २०२६
स्थळ : सेक्टर २५, प्राधिकरण, निगडी पार्किंग ग्राउंड, दिल्ली स्वाद समोर, भेळ चौक.
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी या स्टॉलला आवर्जून भेट द्यावी आणि महिला उद्योजिकांच्या स्वप्नांना बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




Total Users : 233204