spot_img
spot_img
spot_img

चऱ्होलीत देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त; तरुणाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चऱ्होली बुद्रुक परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस बाळगल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुधीर हरिश्चंद्र डोळस (वय ४१, व्यवसाय पोलीस कॉन्स्टेबल, बक्कल क्रमांक २६६६, दिघी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता हॉटेल निलगिरीजवळ, रोडवर, खंडोबा माळा रोड, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, पुणे येथे ही घटना घडल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ओम रामदास मुंगसे (वय २१, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस आढळले. या शस्त्रांची एकूण किंमत ५१ हजार रुपये असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १४ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करणारा आदेश लागू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र बाळगल्याच्या आरोपावरून संबंधित तरुणाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!