spot_img
spot_img
spot_img

मुळशीतील फ्लॅटच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण; जीवे मारण्याची धमकी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

म्हाळुंगे येथे फ्लॅटच्या नावावर करण्याच्या विषयावरून झालेल्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकाला आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विष्णू शिवाजी कोरेवाड (वय ४४, व्यवसाय बांधकाम) यांनी फिर्याद दिली आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता म्हाळुंगे येथील बाजीराव पाडळे चौकाजवळील मोकळ्या जागेत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मण दामोदर नवघरे याने फ्लॅटच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी फिर्यादीला बोलावले होते. संबंधित फ्लॅट फिर्यादीच्या नावावर करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजाभाऊ दामोदर नवघरे यानेही फिर्यादीला हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीचा मुलगा विशाल हा त्यांना सोडवण्यासाठी आला असता त्यालाही आरोपी क्रमांक एकने बांबूने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच, ‘तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्हाला जिवे मारतो,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी लक्ष्मण दामोदर नवघरे आणि राजाभाऊ दामोदर नवघरे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!