spot_img
spot_img
spot_img

पीएम श्री माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक तंत्रज्ञानाचे विश्व!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या DICE (Developing Innovation Culture and Entrepreneurship) कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील एकूण ४० विद्यार्थी व शिक्षकांसाठी जेएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडे, पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.

या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील इनक्युबेशन सेंटर, रोबोटिक्स लॅब, मॅक लॅब, आयडिएशन लॅब तसेच VMC/CNC मशीन सेंटरला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि नवकल्पनांविषयी प्रत्यक्ष माहिती व अनुभव घेतला. विविध प्रयोगशाळांमधील उपकरणे आणि तांत्रिक प्रक्रियांची माहिती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात कशा साकार करता येतात, याची जाणीव झाली.

यानंतर JSPM कॉलेज चे प्रा डॉ. सचिन आर्गडे यांनी विद्यार्थ्यांना Idea Creation या विषयावर मार्गदर्शन केले. नवीन कल्पना कशा सुचवाव्यात, त्यांना नावीन्यपूर्ण स्वरूप कसे द्यावे आणि त्यांचे प्रत्यक्ष उपयोगात रूपांतर कसे करावे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जेएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ताथवडेचे संचालक डॉ. अविनाश बदादे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नवकल्पना, संशोधन, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, नवोपक्रमाची वृत्ती आणि उद्योजकीय विचार विकसित होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांसाठी ही क्षेत्रभेट ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि अनुभवसमृद्ध ठरली.
सदरची क्षेत्रभेट विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब राठोड व या प्रकल्पाच्या समन्वयक श्रीम दीपाली मगदूम यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री नामदेव कोकणे, श्रीम हर्षदा राऊत, सहकारी शिक्षक श्री बालाजी जगताप ,श्रीम स्नेहल भोसले व JSPM कॉलेज यांच्या सहकार्याने पार पडले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!