spot_img
spot_img
spot_img

नवरात्र निमित्त यंग भोर्डे आळी मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त नाना पेठेतील यंग भोर्डे आळी मित्र मंडळाच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी होणार आहे. यावेळी अखंड दीप व पूजा. अर्चना. देवीची विविध मार्गाने मिरवणूक काढून मंडपामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीमध्ये महिलांसाठी महाआरती होणार आहे. सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा
(होम मिनिस्टर) हा कार्यक्रम होणार आहे. कलाकार आर.जे. अक्षय हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा रविवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी नागरिकांसाठी महाप्रसाद,
नगर प्रदक्षिणा, व सायंकाळी
दूधवाटपाचे होणार आहे अशी माहिती यंग भोर्डे आळी मित्र मंडळा सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष,
माजी नगरसेवक अजय भोसले यांनी दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!