शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६’ स्पर्धेत पीसीसीओईच्या टीम अनंतमने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या टीमचे भारतीय एरोस्पेस क्षेत्राकडे टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. टीम अनंतमने रॉकेटरी आणि स्पेस रिसर्च क्षेत्रात नवनवीन आव्हाने स्वीकारण्याच्या आणि अधिक उंची गाठण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवावा. आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील एरोस्पेस आणि स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रातील क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील असे या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील टीम अनंतम – रॉकेटरी अँड स्पेस रिसर्च या विद्यार्थी संघाने ‘एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६’ या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सॉलिड रॉकेट मोटर लॉन्च कॅटेगरी मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘अस्त्र’ या रॉकेटने ९७३ मीटर उंची गाठली आणि रॉकेट प्रक्षेपण करणारी स्पर्धेतील एकमेव यशस्वी टीम आहे.
उत्तराखंड मधील हल्द्वानी येथे एस्ट्रोवर्स या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातून नामांकित २० अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघाने सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये पीसीसीओईच्या टीम अनंतम ला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सर्व टीमला सह संस्थापक शुभम कुमार, अजय रावत यांच्या हस्ते ३० हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
टीम अनंतम ही रॉकेटरी अँड स्पेस रिसर्च ही पीसीसीओई, पुणे येथील मोटर्स स्पोर्ट्स कौन्सिल अंतर्गत कार्यरत असलेली विद्यार्थि नेतृत्वाखालील रॉकेटरी आणि एरोस्पेस संशोधन संस्था आहे. या टीम समन्वयक प्रा. जयेश चोरडिया टीम प्रमुख विवेकानंद झांबरे सदस्य दिव्या पाटील, ओंकार पाटील, कुशल सरोदे, मानसी कटारिया, अनुष्का कालंत्रे, सोहम सपकाळ, साक्षवत भुसारे, प्रथम बोकेफोडे, माधव जोशी यांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे टीम अनंतमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. संशोधन व विकास अधिष्ठाता नरेंद्र देवरे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, सहयोगी अधिष्ठाता अमित पंचवाडकर प्रा. डॉ. जयेश चोरडिया, डॉ. अश्विनी शिंदे यांनी मार्गदर्शन केले.




Total Users : 230038