spot_img
spot_img
spot_img

मोई येथील घरफोडीत १ लाख २० हजारांचा ऐवज लंपास!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहरात राहणाऱ्या नागरिकाच्या मोई येथील घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या दरवाजाचा सेफ्टी डोअर व कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यात आला. त्यानंतर लोखंडी कपाट आणि बेडमधील साहित्य विस्कटून सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी संजय भारत कसबे (वय ४३, व्यवसाय नोकरी) हे पुण्यातील पाषाण परिसरातील लिलाई पार्क सोसायटी येथे राहतात. त्यांचे आई-वडील मोई, ता. खेड, जि. पुणे येथील शिवतेजनगर, फळकेवस्ती परिसरात राहतात.

१७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीचे आई-वडील पुण्यात गेलेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा सेफ्टी डोअर व कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट आणि बेडमधील साहित्याची नासधूस करून सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरून नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३८० आणि ४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले नसून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!