spot_img
spot_img
spot_img

तळेगाव दाभाडेत किरकोळ वादातून तरुणाला मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला हाताने मारहाण करून दगडाने हल्ला केल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे. या प्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद नवनाथ कांबळे (वय ३९, व्यवसाय रिक्षाचालक) हे तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम हॉस्पिटलजवळील सॅमसम नगर परिसरात राहतात.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गोदांबे कडबाकुट्टी, बेलोडर टाउन परिसरालगत, तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडल्याचे नमूद आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यानंतर दगडाने उजव्या हाताच्या बोटांवर मारल्याने तीन बोटांना दुखापत झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी आरोपी संदीप शेंडे आणि त्याचा १९ वर्षीय मुलगा यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२५(अ) आणि ३(५), तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!