spot_img
spot_img
spot_img

काळेवाडीत घरात घुसून तरुणाला मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पत्नीसमवेत झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून चौघांनी संगनमत करून तरुणाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना काळेवाडीतील नढे नगर परिसरात घडली आहे. या घटनेत एका आरोपीने चाकूने पोटावर वार केल्याचा, तर दुसऱ्या आरोपीने डोक्यावर बांबूने मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन संजय वेदपाठक (वय २७, व्यवसाय डान्सर) हे काळेवाडीतील नढे बिल्डिंग, नढे नगर परिसरात राहतात.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी आणि आरोपी क्रमांक २ यांच्यातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार केल्याचा, तर आरोपी क्रमांक २ याने डोक्यावर बांबूने मारून जखमी केल्याचा आरोप आहे. अन्य दोघांनीही मारहाणीत सहभाग घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(२), ११५(२), ३५२ आणि ३(५), तसेच भारतीय दंड संहितेतील कलम ३२४, ३२३, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे :
१. विजय शिवाजी अहिरे, वय अंदाजे २७ वर्षे
२. रोहित शिवाजी अहिरे, वय अंदाजे २५ वर्षे
३. २२ वर्षीय महिला आरोपी
४. २४ वर्षीय महिला आरोपी

चारही आरोपी नढे बिल्डिंग, नढे नगर, काळेवाडी परिसरातील रहिवासी असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!