spot_img
spot_img
spot_img

नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा गौरव

अवनीश भोईरला दोन कांस्य, तर आयुष सायकरला चार रौप्य पदके

शबनम न्यूज | प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या युवा स्केटिंगपटूंचा योगदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत अवनीश राहुल भोईर आणि आयुष राकेश सायकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली. त्यांच्या या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी भोसरी येथील मारुती कंद स्केटिंग ग्राउंड तसेच पीसीएनडीए ग्राउंड येथे जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रोड रेस प्रकारात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेत खेळाडूंनी वेग, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या स्पर्धेतील प्रोफेशनल इनलाइन स्केटिंगच्या १७ वर्षांखालील गटात कु. अवनीश राहुल भोईर याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन कांस्यपदके पटकावली. त्याच्या या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तर प्रोफेशनल इनलाइन स्केटिंगच्या १९ वर्षांखालील गटात रावेत येथील एस. बी. पाटील कॉलेजमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या कु. आयुष राकेश सायकर याने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने स्पर्धेत द्वितीय स्थान मिळवत चार रौप्यपदके पटकावली. आयुषच्या या यशाने त्याच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित अधोरेखित केले आहे.

या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुंजाळ सर यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

चिंचवडचे विद्यमान नगरसेवक आणि योगदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश शिवाजी भोईर यांनीही खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मेहनत, शिस्त, सातत्य आणि जिद्द महत्त्वाची असते. युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अशीच प्रगती करत राहावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

युवा खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमामुळे खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्रीडा प्रवासाला बळ देण्याचा संदेश या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!