spot_img
spot_img
spot_img

हज यात्रेला पाठविण्याचे आमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

हज यात्रेसाठी पाठविण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार काळेवाडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फैयाज अमीर शेख ( रा. काळेवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, रियाज शेख आणि अमीर सरदार शेख या दोघांनी ट्रॅव्हल्स कंपनीचे एजंट व मालक असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. हज यात्रेसाठी मक्का-मदिना येथे पाठविण्याचे सांगून त्यांच्याकडून एकूण ११ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

ही रक्कम अल-खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या एचडीएफसी बँक खात्यावर जमा करण्यात आली. मात्र पैसे घेतल्यानंतर फिर्यादींना हज यात्रेला पाठविण्यात आले नाही. तसेच घेतलेली रक्कम परत मागितल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी रियाज शेख आणि अमीर सरदार शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रियाज शेख याला अटक करण्यात आल्याची नोंद आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!