शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री नागेश्वर विद्यालय मोशी (भागशाळा चिखली) येथे गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘गांधी विचार संस्कार परीक्षा’ बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या परीक्षेत विद्यालयातील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार रुजावेत, त्यांच्या जीवनमूल्यांची ओळख व्हावी आणि नैतिक संस्कार घडवेत या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी फाउंडेशनतर्फे तुकडीनिहाय महात्मा गांधीजींच्या जीवनचरित्रावर व विचारांवर आधारित पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा सखोल अभ्यास करून ही परीक्षा यशस्वीरीत्या दिली.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सानप आर. एन. आणि उपमुख्याध्यापक श्रीमती नाणेकर सविता यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच पर्यवेक्षक सौ. ठोंबरे व लोखंडे एन. एस. यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
परीक्षा प्रमुख सौ. पाटील व्ही. बी. यांच्या नियोजनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या कार्यात सहकारी शिक्षक सौ. बुरुड के. आर. व सौ. घरबुडे जे. एन. तसेच शिक्षकेतर कर्मचारी बुर्डे मामा यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.




Total Users : 229165