न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या पुणे सी.बी.ओ. द्वारा ‘सफाई अभियान’ आणि ‘एक झाड आईच्या नावे’ हे उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारत सरकारच्या देशव्यापी ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाला प्रतिसाद देत न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, पुणे सी.बी.ओ. यांच्या वतीने नुकताच स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व कंपनीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक महेश कुमार यांनी केले. पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या मोहिमेत कंपनीच्या टीमने दोन प्रमुख उपक्रम राबविले. यामध्ये परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘सफाई अभियान’ घेण्यात आले. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘एक झाड आईच्या नावे’ या संकल्पनेअंतर्गत रोपांची लागवड करण्यात आली.
आईच्या सन्मानासोबतच निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वच्छ, सुंदर आणि हरित भारताच्या निर्मितीसाठी संस्थेची सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित झाली.




Total Users : 228692