spot_img
spot_img
spot_img

पिंपरीत ‘सेवा के रंग, राष्ट्र के संग’ उपक्रम उत्साहात; रांगोळीतून साकारला ‘विकसित भारत’चा संकल्प!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत’ हा दूरदर्शी विचार देशात साकारत आहे. या विचाराला आणि देशातील लोककल्याणकारी विकासकामांना कलात्मक जोड देण्यात आली. यादरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील साई गार्डन, संभाजीनगर येथे ‘सेवा के रंग, राष्ट्र के संग’ हा विशेष उपक्रम 03 ऑक्टोबर 2026 रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. आमदार श्री. अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात महिला कार्यकर्त्या आणि नागरिकांनी प्रचंड उत्साह दाखवला. या कार्यक्रमात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या “विकसित भारत” या संकल्पनेचा आणि या अंतर्गत झालेल्या विकासकामांचा आढावा रांगोळीच्या माध्यमातून मांडण्यात आला.

सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्ती
रंगीबेरंगी आणि आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचे, विकासाचे आणि जनकल्याणकारी योजनांचे चित्र यावेळी साकारण्यात आले. या उपक्रमातून सेवा, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवण्यात आला.

याप्रसंगी पिंपरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्रभागातील ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेवक श्री. मंदार देशपांडे, माजी नगरसेविका सौ. वैशालीताई गोगावले-खाडिया, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री. अजित भालेराव, मंडल अध्यक्ष श्री. धर्मराज वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन नगरसेवक कुशाग्र मंगला अशोक कदम यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आणि सहभागी महिलांच्या कलागुणांचे मनःपूर्वक कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव, राष्ट्रप्रेम आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!