शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिर्डी साई दरबारी बी. दि. चेंज फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श शिक्षिका सौ. शितल औटी यांचा ‘महाराष्ट्र गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षिका शितल औटी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव जावळे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




Total Users : 228144