spot_img
spot_img
spot_img

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधव ची तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभाग आयोजित शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधव याने १४ वर्षे खालील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी केली.
इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या सक्षम ने एकूण ६ फेऱ्यांमध्ये प्रत्येकी ५ गुणांचे लक्ष साध्य करीत उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि सर्व फेऱ्या जिंकल्या. एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी या त्याच्या मार्गदर्शिका आहेत. सक्षम इयत्ता ३ री पासून बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त श्वेता चंडालिया यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

कासारवाडी प्राथमिक शाळा येथे झालेल्या या स्पर्धेत २४ शाळांनी सहभाग घेतला होता. विविध गट व प्रकारांमध्ये सुमारे ५६ वैयक्तिक खेळाडू आणि १८ संघांनी सहभाग नोंदविला होता.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय अभ्यासक्रम बरोबरच विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी उत्कृष्ट सेवा सुविधा उपलब्ध करून दिला जातात त्यामुळेच सक्षम जाधव याला हे यश प्राप्त झाले असल्याचे प्राचार्य डॉ. बिंदु सैनी यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सक्षम जाधव, क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी, मुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांचे अभिनंदन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!