spot_img
spot_img
spot_img

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आणि एआय च्या माध्यमातून सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय – आशिष पाटील

शबनम न्यूज | प्रतिनिधी
आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवोपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा प्रभावी वापर करून समाजा समोरील विविध समस्या अधिक कार्यक्षम आणि शाश्वत पद्धतीने सोडविता येऊ शकतात, असे प्रतिपादन पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीचे जागतिक कार्यक्रम व्यवस्थापक आशिष पाटील यांनी केले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च येथे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२६-२७’ या स्पर्धेचे भारत सरकार शिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेल अंतर्गत आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते. यामध्ये ५९० पेक्षा जास्त विद्यार्थी संघ सहभागी झाले होते. त्यापैकी ५० संघांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. 
   आशिष पाटील यांनी सांगितले की, विविध उद्योगांमध्ये एआय चा वापर डेटा विश्लेषण, निर्णय प्रक्रिया, उत्पादन व्यवस्थापन, ग्राहक सेवा तसेच जटिल समस्यांचे जलद आणि अचूक निराकरण करण्यासाठी केला जातो.
     महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची गरज विद्यार्थी यांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात. आरोग्य, शिक्षण, शेती, पर्यावरण, वाहतूक, ग्रामीण विकास आणि सार्वजनिक सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी एआय चा प्रभावी आणि जबाबदारीने वापर करता येऊ शकतो. कोणतीही समस्या सोडविताना प्रथम समस्येचे सखोल आकलन करणे, आवश्यक माहिती व डेटा संकलित करणे, योग्य तंत्रज्ञानाची निवड करणे आणि त्यावर आधारित प्रत्यक्ष उपयोगात येईल असा परिणामकारक उपाय विकसित करणे आवश्यक असल्याचे डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.
     पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे. विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन केले.
    अनसन पुणे वरिष्ठ प्रणाली अभियंता योगेश सहाणे, एक्सेंचर, पुणे सहयोगी व्यवस्थापक श्रीकांत सावलकर, सह संस्थापक रेगेल ग्लोबल सिक्युरिटी कन्सल्टंट शशांक बोरुडे, एपेक्सन पुणे कार्यक्रम व्यवस्थापक स्वप्नील वडगावे,  एपेक्सन पुणे, वरिष्ठ एआय अभियांत्रिकी प्रतिक पवार, एक्सेंचर पुणे सॉफ्टवेअर डेव्हलपर अभय राजपूत, डेलॉइट यूएसआय, सल्लागार डेटा सायन्स नोलेश वारके, पबमॅटिक, पुणे सॉफ्टवेअर अभियंता अथर्व निंबाळकर, डसॉल्ट सिस्टम सोल्युशन लॅब पुणे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मुकेश तांदळे, एसएएस आर अँड डी पुणे वरिष्ठ माहिती सुरक्षा विश्लेषक प्रियांशु कुक्कर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
    अधिष्ठाता प्रा. डॉ. अर्चना चौगुले,  अधिष्ठाता डॉ. विजय कोतकर, समन्वयक प्रा. दिप्ती चौधरी आदी उपस्थित होते.
    स्वागत प्रा. दिप्ती चौधरी, सूत्र संचालन तृप्ती खेरडे आणि आभार प्रा. दिपा महाजन यांनी मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!