शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वरसंगत फाऊंडेशन प्रस्तुत, गानसम्राट मोहम्मद रफ़ी यांना समर्पित ‘बेमिसाल रफ़ी’ हा कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे हाऊसफुल गर्दीत संपन्न झाला.
प्रख्यात गायक अली हुसैन यांच्या आवाजात मधुबन में राधिका नाचे रे, ये देश है वीर जवानों का, शोधिसी मानवा सारखी अजरामर गाणी ऐकून रसिकांनी भरभरून दाद दिली. सह-गायक श्रुती जोशी, शुभ्रसमीर दास आणि सर्व वादक कलाकारांनी – विवेक परांजपे, सईद खान, हार्दिक रावल विशाल, आसिफ इनामदार यांनीही सुंदर सादरीकरण केले.
सायरा अली हुसैन यांच्या हिंदी, मराठी आणि उर्दू भाषेतील ओघवत्या निवेदनाला* देखील प्रचंड दाद मिळाली.
या कार्यक्रमाला (सुरेश कलमाडी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित) ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आवर्जून उपस्थित होते.




Total Users : 224868