spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित बॉक्सिंग स्पर्धेचे निकाल जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

३८व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या स्पर्धा पुण्यातील भवानी पेठ येथील वस्ताद लहुजी साळवे स्टेडियमवर येथे रंगल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या या स्पर्धेत १८ वर्षांखालील विविध ८ वजनगटात ६० मूली आणि ८०मुले खेळाडू सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे  –

१.      बेस्ट बॉक्सर पुरस्कार – काव्य जाधव( KLVSP BOXING CLUB )

२.     बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर पुरस्कार – अनुष्का राय AK (बॉक्सिंग अकॅडमी वाकड)

३.     बेस्ट चॅलेंजर पुरस्कार – वैष्णवी घुले (वीरा मल्टी स्पोर्ट्स अकॅडमी फुरसुंगी)

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले हे यावेळी उपस्थित होते.

मल्लखांब निकाल-

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मल्लखांब स्पर्धा महाराष्ट्र मंडळ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

सर्वात उत्कृष्ट मल्लखांबपट्टू  (मुले)

१.     इशान जाधव (सीनियर ग्रुप)

२.    श्रीराज जाधव ( जुनियर ग्रुप)

सर्वात उत्कृष्ट मल्लखांबपट्टू  (मुली)

१.    शमीका उभे (सिनियर ग्रुप)

२.    श्राव्या रास्ते (जुनियर ग्रुप )

या स्पर्धेचे अभिजीत भोसले आणि सचिन परदेशी समन्वयक होते. प्रसेनजीत फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले हे यावेळी उपस्थित होते.

पिकलबॉल – ‘

पिकलबॉल’ स्पर्धेचे मसलबार स्पोर्ट्स क्लब, उंड्री येथे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत १००हुन अधिक स्त्री – पुरुष स्पर्धक सहभागी झाले होते.  यामध्ये बिगनर्स, ३५ वर्षावरील आणि इंटरमीडिएट या विभागात स्पर्धा पार पडल्या. पुणे पिकलबॉल असोसिएशनचे  खजिनदार अमिराज चौधरी व सचिव कुलदीप रौचंदानी हे समन्वयक होते.

स्पर्धेचा निकल पुढील प्रमाणे –

अनिकेत शिंदे  व  अपर्णा चौधरी (विनर इंटरमीडिएट मिक्स्ड डबल्स ) , आरती पांडे व हर्षल लालवानी (रनरप इंटरमीडिएट मिक्स्ड डबल्स)

पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

छायाचित्रकार स्पर्धा निकाल –

पुणे फेस्टिव्हल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या तर्फे प्रेस फोटोग्राफरच्या छायाचित्राचे प्रदर्शन व स्पर्धा बालगंधर्व येथे पार पडल्या. त्याचा निकल पुढीलप्रमाणे –

१.      प्रथम क्रमांक १० हजार रुपये –  आशिष काळे (महाराष्ट्र टाईम्स)

२.     द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये – कपिल पवार (लोकमत)

३.     तृतीय क्रमांक ५ हजार रुपये –अरुल होरायझन (इंडियन एक्सप्रेस)

ज्येष्ठ छायचित्रकर व फेम चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. सकाळ माध्यम समूहाचे संपादक नीलेश खरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यावेळी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!