शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे फेस्टिवलअंतर्गत “व्हॉइस ऑफ पुणे” या सुगम संगीत स्पर्धेचे यंदा १६ वे वर्ष असून, गेल्या पंधरा वर्षांतील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते अशा निवडक कलाकारांना एकत्र घेऊन ‘आशा सुमन’ – अर्थात गानसम्राज्ञी आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या अजरामर गीतांना समर्पित विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९ ते १२ या वेळेत सादर करण्यात आला.
या कार्यक्रमाची संकल्पना अॅड. अनुराधा भारती यांची असून कार्यक्रम समन्वयक नितीन कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली.
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, टाळ्यांचा कडकडाट आणि एकापेक्षा एक सरस गाण्यांना मिळालेली ‘वन्स मोअर’ची दाद. या कार्यक्रमात नितीन कुलकर्णी, उमेश पेडगावकर, अनिल दाभाडे, डॉ. अजय नित्तुरकर, सुब्रसमीर दास, किशोरी तांबोली, प्रीती वाटे, रुपलेखा हेगडे, प्रज्ञा खरात आणि डॉ. रोहिणी काळे यांनी आशा-सुमन यांची गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.
वाद्यवृंद – की-बोर्ड: मिहिर भडकमकर आणि रशीद शेख, तबला: रोहित पवार, ऑक्टापॅड: ऋतुराज कोरे.
सादर झालेली गीते: अजहू ना आये बालमा (सुमन कल्याणपूर), तुमसे वो हसीना, ना ना करते प्यार, ये बदलते रिश्ते, गरजता बरसता, तुमने पुकारा, आजकल तेरे मेरे प्यार, दीवाना हुआ बादल, गुनगुना रहे हैं, छोड़ दो आँचल, ये रातें ये मौसम, अभी ना जाओ छोड़ के, पिया पिया पिया, तू तू ही वही, ये लड़का हाय अल्लाह, जीवन के हर मोड़ पर, एक मैं एक और तू, लेकर हम दीवाना दिल, जाने जां, आजा मैं हूँ प्यार तेरा आणि विशेष मेडले – रात बाकी, प्यार करने वाले, जवानी जानेमन, हुस्न के लाखों रंग, ये मेरा दिल, पिया तू अब तो आजा.




Total Users : 224587