spot_img
spot_img
spot_img

३८ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डर्ट ट्रॅक स्पर्धेत तरुणाईचा जोश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्याच्या गोळीबार मैदानात ३८ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत डर्ट ट्रॅक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये विविध गटांमध्ये २२५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पुण्या बरोबरच कोल्हापूर, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, गडहिंग्लज येथिल स्पर्धकांनी देखील भाग घेतला होता. त्यात नोविस क्लास, मॉडिफाइड बाइक्स १२५ cc, २५०cc, ३५०cc महिला गट व स्कूटर गट हे गट होते. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक अड. अभय छाजेड यांनी विविध स्पर्धक गटाना फ्लैग ऑफ करून या स्पर्धेस प्रारंभ केला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक प्रमुख डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष मनोज भोरे उपस्थित होते.

फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) ची मान्यता या स्पर्धेस लाभली आहे. ‘एक्स्ट्रीम रेसिंग व मोटार स्पोर्ट्सच्या’ संस्थापक शीतल राठोड या स्पर्धेच्या समन्वयक आहेत. याप्रसंगी Rida sayyad, Zayden Chindhy व Evan Chindhy या पुण्याच्या १० वर्षांच्या मुलांनी टूव्हीलर गाड्यांचे डेमोस्ट्रेशन दाखवून सर्वाना चकित केले. पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!