spot_img
spot_img
spot_img

अशफाक शेख यांना अहद फाउंडेशनतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; उर्दू माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी सातत्याने कार्य

पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक तसेच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष व उर्दू माध्यमिक विद्यालय रुपीनगर चे शिक्षक श्री. अशफाक शेख यांना अहद फाउंडेशनतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार अहद फाउंडेशनचे संस्थापक श्री. मजहर मणियार व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजी IPS अधिकारी तथा IGP श्री. अब्दुल रहमान यांच्या हस्ते श्री. अशफाक शेख यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी नगरसेविका आसीया मणियार, नगरसेवक प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते मोहन दादा जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक रफिक शेख, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन भाई शेख, झाहिद भाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

श्री. अशफाक शेख हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी योगदान देण्याबरोबरच ते पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील उर्दू माध्यमातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, शिक्षकांच्या अडचणी व शैक्षणिक प्रश्न प्रशासनासमोर मांडणे तसेच उर्दू शिक्षणाच्या विकासासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगर या विद्यालयाला यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ‘सर्वोत्कृष्ट माध्यमिक विद्यालय’ प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यालयाच्या शैक्षणिक व विविध उपक्रमांमध्ये श्री. अशफाक शेख यांचेही विशेष योगदान राहिले आहे.

याच कार्यक्रमात उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगरच्या मुख्याध्यापिका सौ. टिळेकर एम. एन. यांनाही सन्मानित करण्यात आले.

अहद फाउंडेशनतर्फे मिळालेल्या या सन्मानाबद्दल श्री. अशफाक शेख यांचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

“उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि अधिकाधिक शैक्षणिक संधी मिळाव्यात, यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे कार्य करत राहणार,” अशी भावना श्री. अशफाक शेख यांनी व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!