spot_img
spot_img
spot_img

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये रुग्णांना फळवाटप

पुणे प्रतिनिधी – शंकर जोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट ओबीसी मोर्चा आणि भवानी माता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवीताई चंद्रशेखर जावळे, शंतनूभाऊ कांबळे, संतोष यादव, आशिष जानजोत, अभिजित कसबे, दिनेश रासकर, अमित जैन, नितीन भोईर, साईनाथ सपकाळ, भीमराव देवकाते, मनोज बनकर, आतिश माकवाना, नागेश धनगर, सुनील वाल्हेकर, संजय वाघमारे, स्वाती पत्री, विद्याताई चव्हाण, विजय चव्हाण, सचिन मकवाना, आफ्रिदी पटेल, सुनील मुंजे, पुष्पक चव्हाण, संदीप उमापे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विकी पांडुरंग ढोले यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!