spot_img
spot_img
spot_img

तृतीयपंथी विभागाच्या अध्यक्षा निर्जला गायकवाड यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती

पुणे : गणेशोत्सवादरम्यान सामाजिक ऐक्य आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देत प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तृतीयपंथीना मानाचे स्थान देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या पुणे शहर तृतीयपंथी विभागाच्या अध्यक्षा निर्जला गायकवाड यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गणरायाची तसेच गुरुवर्य जोगोबादादा वस्ताद तालीम मंडळाच्या गणपती बाप्पांची मनोभावे महाआरती करण्यात आली.

यावेळी मंडळांच्या वतीने निर्जला गायकवाड यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात मानाचे स्थान देण्याचा हा उपक्रम सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरला.

तृतीयपंथीच्या हस्ते गणरायाची आरती करून त्यांना धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सन्मानाने सहभागी करून घेण्याच्या या उपक्रमामुळे भेदभाव दूर करण्यास आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीला बळ मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!