शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने उम्मीद द होप फाउंडेशनच्या वतीने ‘आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीत तसेच राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यात संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करत असतात. त्यांच्या या योगदानाची दखल घेत फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उम्मीद द होप फाउंडेशनचे अध्यक्ष काशिफ फखरुल सय्यद यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याला सलाम केला. समाज आणि शिक्षणाच्या उन्नतीसाठी उम्मीद द होप फाउंडेशन भविष्यातही सातत्याने कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरला. शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या योगदानाला समाजानेही प्रोत्साहन देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.





Total Users : 225980