शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिरगाव परिसरात सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांवर कारवाई केली. मटका जुगारासाठी आकडे लिहून घेत असताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह एकूण 21 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस हवालदार रितेश कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिरगाव परिसरात काही जण मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी मनोहर गायकवाड आणि सुनील गोपाळे हे मटका जुगारासाठी आकडे लिहून घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 21 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगारावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मटका व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.










Total Users : 222779